वन डे वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेणार?, सुनील गावस्करांची काय भविष्यवाणी ?

सुनील गावस्कर म्हणाले आहेत की, टी-20 फॉरमॅटमध्ये गुजरात टायटन्स आणि टीम इंडियासाठी त्यानं केलेल्या कॅप्टन्सीनं आपण प्रभावित झालेलो आहोत. जर मुंबईतील वन डे हार्दिकनं जिंकून दाखवली तर 2023 वर्ल़्ड कप संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

मुंबई- टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर (Sunil Gavskar) यांनी हार्डिक पांड्या (Hardik Pandya) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याबाबत भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाची जबाबदारी वन डे वर्ल्ड कपनंतर हार्दिककडे सोपवण्यात येईल, असं भाकित त्यांनी वर्तवलंय. यासाठी हार्दिकला ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध होणारी पहिली वन डे मॅच कॅप्टन म्हणून जिंकून दाखवावी लागेल, असंही गावस्कर म्हणालेत. टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा वानखेडे स्टेडिटमवर होणारी पहिली वन डे कौटुंबिक कारणामुळं खेळू शकणार नाहीये.

पहिल्या वन डे साठी हार्दिक पांड्याकडे धुरा

रोहित शर्मा पहिल्या मॅचमध्ये नसल्यामुळे हंगामी कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याकडे धुरा असणार आहे. 29 वर्षांचा ऑलराऊंडर असलेला हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएल 2022 मध्ये पहिल्यांदाच ग्राऊंडवर उतरलेल्या गुजरात टायटन्सची कॅप्टन्सी करताना आणि टीमला चॅम्पियन करण्यासाठी हार्दिकनं मोठी मेहनत घेतली होती. तर टी-20 त टीम इंडियाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व त्यानं केलंय. त्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियानं 11 टी-20 खेळल्यात त्यातल्या 8 त्यानं जिंकून दाखवल्यात, तर एक ड्रॉ झाली होती.

गावस्करांनी केलं हार्दिक पांड्याचं कौतुक

सुनील गावस्कर म्हणाले आहेत की, टी-20 फॉरमॅटमध्ये गुजरात टायटन्स आणि टीम इंडियासाठी त्यानं केलेल्या कॅप्टन्सीनं आपण प्रभावित झालेलो आहोत. जर मुंबईतील वन डे हार्दिकनं जिंकून दाखवली तर 2023 वर्ल़्ड कप संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मीडल ऑर्डरमध्ये हार्दिक पांड्याची टीममधील उपस्थिती टीमसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचंगही गावस्कर म्हणालेत. अनेकदा त्या ठिकाणी खेळताना हार्दिकनं गेमचेंजरची भूमिका वठवली असल्याचंही ते म्हणालेत. जबाबदारी घेण्याची तयारी हार्दिककडे आहे. पुढे जाऊन हार्दिक टीमचं नेतृत्व करेल, असं भआकितही त्यांनी वर्तवलंय. कॅप्टन्सी करतानाची हार्दिकची शैलीही विशेष पसंत असल्याचं प्रमाणपत्रच गावस्कर यांनी हार्दिकला दिलंय.