KL राहुल LSG कर्णधारपदाचा राजीनामा देणार का? मालक संजीव गोएंकाच्या अपमानित कृत्यानंतर काय असेल निर्णय

कॅमेऱ्यांनी ही घटना कैद केल्यामुळे या वादाला तोंड फुटले आहे. सामन्यानंतरच्या दृश्यांवरून एलएसजीचा कर्णधार राहुल आणि मालक गोयंका यांच्यात जोरदार चर्चा झाली.

    KL राहुल – संजीव गोएंका : 8 मे रोजी बुधवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा 10 विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एलएसजीचा कर्णधार केएल राहुल आणि संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर क्रिकेट चाहते प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर पुढील सामन्यांमध्ये केएल राहुल कॅप्टन्सी करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    कॅमेऱ्यांनी ही घटना कैद केल्यामुळे या वादाला तोंड फुटले आहे. सामन्यानंतरच्या दृश्यांवरून एलएसजीचा कर्णधार राहुल आणि मालक गोयंका यांच्यात जोरदार चर्चा झाली. या घटनेचा विचार करून केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद सोडू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. गुरुवारी पीटीआयने आपल्या एका वृत्तात दावा केला आहे की, केएल राहुल पुढील दोन सामन्यांसाठी कर्णधारपद सोडण्याचा आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार करत आहे असा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे.

    पुढील लखनौ सुपर जायंट्सचा सामना 14 मे रोजी आहे. अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे जर राहुल व्यवस्थापनाने योजना आखली तर उरलेल्या दोन सामन्यांमध्ये फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकतो. यंदाच्या हंगामामध्ये केएल राहुलने 12 सामन्यांमध्ये 460 धावा केल्या आहेत, परंतु चिंता त्यांच्या स्ट्राईक रेटची आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामान्यांच्या पराभवाने लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांचा संयम सुटला आणि तो मैदानावरच लखनऊचा कर्णधार केएल राहुलवर राग काढताना दिसला. संजीव गोयंकाच्या या व्हिडिओनंतर अनेक चाहत्यांनी केएल राहुलने लखनऊचे कर्णधारपद सोडावे, अशी मागणी केली. लखनौने केएल राहुलला पुढच्या हंगामासाठी कर्णधारपदी कायम ठेवू नये, अशीही चर्चा आहे.

    लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना 
    या सामन्यांमध्ये लखनौच्या संघाने पहिले फलंदाजी केली. परंतु, त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादविरुद्ध 165 धावा केल्या होत्या. पण प्रत्युत्तरात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी तुफानी शैलीत फलंदाजी करत हैदराबादला अवघ्या 9.4 षटकांत विजय मिळवून दिला.