भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात, आर आश्विन करणार का ५०० विकेट्सचा टप्पा पार?

भारताचा तरुण फलंदाज शुभमन गिलला त्यांच्या कारकिर्दीमध्ये १००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ३४ धावांची गरज आहे. या मालिकेमध्ये तो हा आकडा नक्कीच पार करेल. टेंबा बावुमाही तीन हजार कसोटी धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे.

    भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील दोन कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. आजपासून या कसोटी सामान्यांची सुरुवात होईल. भारताचे खेळाडू प्रथमच दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताच्या खेळाडूंचे सरावाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दुसरीकडे, भारताविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटीतील विक्रम कायम ठेवण्यासाठी प्रोटीजही पूर्णपणे सज्ज आहेत. आता कोणाची तयारी चांगली आहे हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, मात्र या मालिकेत दोन्ही संघातील काही खेळाडू मोठी उंची गाठणार आहेत हे निश्चित.

    सुरु होणाऱ्या या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलु केशव महाराज हा कसोटी सामन्यांमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज बनू शकतो. तर आर अश्विन हा ५०० कसोटी बळीचा आकडा गाठणार आहे आणि अश्विन हा जगामधील ९ वा गोलंदाज बनू शकतो. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा फिरकी गोलंदाज होण्याच्या जवळ आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत १५८ विकेट्स आहेत. या मालिकेत त्याने १३ विकेट घेतल्यास तो माजी प्रोटीज फिरकीपटू ह्यू टेफिल्डला (१७०) मागे टाकेल.

    भारताचा तरुण फलंदाज शुभमन गिलला त्यांच्या कारकिर्दीमध्ये १००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ३४ धावांची गरज आहे. या मालिकेमध्ये तो हा आकडा नक्कीच पार करेल. टेंबा बावुमाही तीन हजार कसोटी धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. यासाठी त्याला फक्त तीन धावांची गरज आहे. जर आर अश्विनला या दोन कसोटी सामन्यांसाठी प्लेइंग-११ मध्ये संधी मिळाली तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा आकडा गाठणारा जगातील ९ वा गोलंदाज बनू शकतो. या आकड्यापासून तो केवळ ११ विकेट्स दूर आहे. दक्षिण आफ्रिकेत फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नसली तरी, अशा परिस्थितीत टीम इंडिया प्लेइंग-११ मध्ये दोन फिरकीपटूंचा समावेश करेल, अशी आशा कमी आहे. येथे अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाला संघाचे प्राधान्य असू शकते.