रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार का? अंबाती रायडूच्या वक्तव्याने हाहाकार!

आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईकडून खेळलेला माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू याने रोहित शर्मा भविष्यात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकतो, असे म्हटले आहे.

    इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा सीझन म्हणजेच आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आगामी आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. वास्तविक मुंबई इंडियन्सने पाचवेळा विजेत्या कर्णधाराला त्याच्या पदावरून हटवून स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवली आहे. त्यानंतर रोहितबाबत अनेक दावे केले जात आहेत. आता माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने त्याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

    आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईकडून खेळलेला माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू याने रोहित शर्मा भविष्यात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकतो, असे म्हटले आहे. रोहित हा चेन्नईचा पुढचा कर्णधार असेल असेही त्याने सांगितले. रायुडूने एका मुलाखतीत सांगितले की, “मला रोहितला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना पाहायचे आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर रोहित चेन्नईचे कर्णधारही बनू शकतो. रोहित चेन्नईसाठी खेळला तर खूप चांगले होईल. तो आरामात असेल. पुढील 5 आयपीएलमध्ये खेळू शकतो.

    रायुडू पुढे म्हणाला, “जर रोहितला कर्णधार बनवायचे असेल तर तो कोणत्याही संघाचे नेतृत्व करू शकतो. मात्र, हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त रोहितला आहे. त्याला कर्णधार व्हायचे की नाही हा त्याचा निर्णय असेल. चेन्नईत तो कर्णधार असेल की नाही. फक्त त्याच्यावर अवलंबून असेल.”