प्लेऑफचा तिसरा संघ आज मिळणार का? हैदराबाद भिडणार गुजरातशी

गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ 2016 ला चॅम्पियन झाला होता.

    हैदराबाद विरुद्ध गुजरात : इंडियन प्रीमियर लीग 2024चा (IPL 2024) आज ६६ वा सामना रंगणार आहे. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Taitans) हे दोन संघ आज आमनेसामने असणार आहेत. यामध्ये कोणता संघ विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हैदराबादचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. जर सनरायझर्स हैदराबादचा संघ आज विजयी झाला तर त्यांना आज प्लेऑफमध्ये एंट्री करण्याची संधी आहे. गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ 2016 ला चॅम्पियन झाला होता.

    सनरायझर्स हैदराबादच्या मागील सामन्यांमध्ये संपूर्ण खेळ हा ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मावर अवलंबून होता. हैदराबादचे दोन्ही सलामीवीर फलंदाज खूपच मजबूत आहेत. त्यामुळे जर या दोन फलंदाजांचा खेळ गडगडला तर ते अपयशी ठरू शकतात. मागील सामन्यांमध्ये सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांनी लखनौ सुपरजायंट्ससमोर दहा विकेट्स शिल्लक असताना 166 धावांचे लक्ष्य ठेवले. अवघ्या 4 षटकांत पूर्ण केले. जर हैदराबादने आजचा सामना जिंकला तर त्यांचे 16 गुण होतील. यंदाच्या आयपीएलमध्ये पात्र ठरणारा तो तिसरा संघ ठरणार आहे.

    गुणतालिकेची स्थिती

    कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत. त्यामुळे सध्या सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे 14 गुण आहेत हे दोन्ही संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे या तीन संघांमध्ये कोणते दोन संघ प्लेऑफ मध्ये जागा मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तर दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ प्लेऑफमधून बाहेर झाले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये कोणते चार संघ जागा मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.