महिला टि-20 विश्वचषक: उपांत्य फेरीसाठी भारताला आयर्लंडविरुद्ध आज जिंकावेच लागेल; ‘ह्या’ खेळाडूंना संघात संधी मिळणार? सामना कुठे व किती वाजता?

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे तीन सामन्यांत दोन विजयांसह ४ गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडने सलग तीन विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

क्वेबेऱ्हा (दक्षिण आफ्रिका) : महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत (Women T-20 World Cup) भारतीय महिला संघाने (Indian women team) पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मात्र भारतीय संघाच्या मोहिमेस इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला. आता उपांत्य फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी भारतीय महिला संघाला सोमवारी आयर्लंडविरुद्ध मोठय़ा विजयाची आवश्यकता असेल. विश्वचषक स्पर्धेत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (Pakistan) सलामीच्या सामन्यात धूळ चारली, त्यानंतर आता भारतीय महिलांनी विश्वचषकातील दुसऱ्या टी-२० दुसऱ्या सामन्यात वेस्ट विंडीजला (India-West Windies) सहा विकेटनी हरवत शानदार विजय मिळवला होता.

मोठ्या फरकाने जिंकावे लागेल…

दरम्यान, इंग्लंडने भारताच्या विजयी घौडदौडला लगाम लावल्याने भारताला आज आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने जिंकावे लागेल, तरच भारतालाय उपांत्य फेरीत दाखल होण्याची आशा आहे. महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे तीन सामन्यांत दोन विजयांसह ४ गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडने सलग तीन विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

या फलदांजाकडून अपेक्षा…

कर्णधार हरमनप्रीत आणि शफाली वर्मा यांना अजून गुणवत्तेला न्याय देता आलेला नाही. यांची बॅट आज तरी तळपणार का? भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने पुनरागमन करत इंग्लंडच्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली.  रिचा घोषच्या फलंदाजीत सातत्य आहे. पण शफाली, यास्तिका भाटिया, कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. पाकविरुद्ध मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (३८ चेंडूंत नाबाद ५३) निर्णायक अर्धशतक झळकावले पण इंग्लंडच्या सामन्यात चमक दाखवता आली नाही. त्यामुळं आज या फलंदाजाकड़ून मोठ्या अपेक्षा आहेत.

गोलंदाजी सुधारावी लागले…

गोलंदाजीचा विचार केल्यास, भारतीय गोलंदाजांना आपल्या चुका सुधाराव्या लागतील. पूजा वस्त्राकर व रेणुका सिंह ठाकूर या मध्यमगती गोलंदाजांकडून संघाला अपेक्षा असतील. तसेच फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड यांच्यासमोर आयर्लंड संघाच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल. रेणुका सिंह ठाकूर हिने इंग्लंडच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या मात्र अन्य गोलंदाजाकडून तिला साथ मिळाली नाही. त्यामुळं आजच्या सामन्यात गोलंदाजांना चुका सुधाराव्या लागतील.

सामना कुठे व किती वाजता पाहता येणार…

टि-२० महिला विश्वचषकतील आजचा भारतीय महिलांचा तिसरा सामना आहे. हा सामना द. आफ्रिकेतील क्वेबेऱ्हा येथे खेळवला जाणार आहे. सामन्याची वेळ सायंकाळी ६.३० वाजता आहे. तर सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १ हिंदी दिसेल.