womens asia cup 2022

श्रीलंकेच्या (India Vs Sri Lanka) संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने २० षटकांत ६ बाद १५० धावा केल्या आणि त्यानंतर १८.२ षटकांत श्रीलंकेचा डाव १०९ धावांत गुंडाळला. भारताकडून हेमलताने तीन आणि पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

    नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघातील(women’s cricket team) दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं आज (शनिवार) सिलहट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप २०२२ टी-२० (Womens Asia Cup 2022) स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा ४१ धावांनी पराभव केला.

    श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने २० षटकांत ६ बाद १५० धावा केल्या आणि त्यानंतर १८.२ षटकांत श्रीलंकेचा डाव १०९ धावांत गुंडाळला. भारताकडून हेमलताने तीन आणि पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

    महिला आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात आज सिलहेत येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. टीम इंडियाकडून श्रीलंकेला १५१ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, चौथ्या षटकातच श्रीलंकेने कर्णधार चमारी अटापट्टूची विकेट गमावली.

    सहाव्या षटकात मलशा शेहानीने शॉर्ट कव्हर्सच्या दिशेने एक चेंडू हलका खेळला आणि धावांसाठी धाव घेतली. शेहानीनं झटपट धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण दीप्ती शर्माच्या चपळाईसमोर ती अपयशी ठरली. दीप्तीने पॉईंटवरून येऊन झटपट चेंडू उचलला आणि नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला वेगवान आणि अचूक थ्रो मारला.