भारताने ४x४०० मीटर रिले शर्यतीत रचला इचिहास, पुरुष संघ 4×400 मीटरच्या अंतिम फेरीत पोहोचला, आशियाई विक्रम मोडला

भारताच्या पुरुष संघाने या चॅम्पियनशिपच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

    जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप : हंगेरीमधील बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या चॅम्पियनशिपच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे. हम्मद अनास याहिया (Hammad Anas Yahia), अमोज जेकब (Amos Jacob), मुहम्मद अजमल वरियाथोडी (Muhammad Ajmal Variathodi) आणि राजेश रमेश (Rajesh Ramesh) या भारतीय चौकडीने हे संस्मरणीय यश मिळवले आहे. भारतीय पुरुष संघाने ४x४०० मीटर रिले शर्यतीत २:५९.०५ अशी वेळ नोंदवून आशियाई विक्रम मोडला. यापूर्वीचा विक्रम जपानच्या खेळाडूंच्या नावावर होता.

    भारताच्या संघाने या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अमेरिकेचा संघ पहिल्या क्रमांकाने अंतिम फेरीत गेला आहे. अव्वल स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अमेरिकेविरुद्ध भारताला हीट-१ मध्ये ठेवण्यात आले होते. अमेरिकन खेळाडूंनी ही शर्यत दोन मिनिटे ५८.४७ सेकंदात पूर्ण केली. भारत शर्यतीत ग्रेट ब्रिटन आणि बोत्सवानासारख्या संघांपेक्षा पुढे होता, ही कामगिरी आश्चर्यकारक होती. जमैका (2:59:82 सेकंद), फ्रान्स (३:००:०५ से.) आणि इटली (३:२२:१४ से.) आणि नेदरलँड (३:००:२३ से.) यांनी हीट-२ मधून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या धावेनंतर सहाव्या क्रमांकावर असलेल्या मुहम्मद अनास याहियाने भारताची सुरुवात केली.

    अमोज जेकबच्या शानदार धावाने भारताला दुसऱ्या स्थानावर नेले. त्यानंतर महंमद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांनी ती मोलाची आघाडी कायम राखली. राजेशने क्षणार्धात अमेरिकेच्या जस्टिन रॉबिन्सनला अँकर लेगमध्ये हरवले आणि स्टेडियममधील चाहते थक्क झाले. आतापर्यत जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताकडे फक्त दोन वेळच पदके जिंकता आली आहेत. २००३ मध्ये अंजु बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उदित कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने गेल्या वर्षी यूजीन, यूएसए येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले. यावेळी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या झोतात काही पदके येऊ शकतात.