नेहराने तेव्हा फलंदाजांना पॅव्हेलियन मध्ये पाठवले, यावेळी शमी-बुमराहनं थेट फलंदाजांचे दांडे उडवले

भारताच्या संघाने यापूर्वी २००३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८२ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यातही भारताच्या संघाने गोलंदाजी निर्णायक ठरली होती.

    वर्ल्डकप २०२३ : वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघाने तब्बल २० वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध शानदार विजय नोंदवला. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने ८२ धावांनी पराभव केला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताच्या संघाने रविवारी 30 ऑक्टोबर रोजी आपल्या सहाव्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने २० वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध विजयाची नोंद केली आहे. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने ८२ धावांनी पराभव केला होता. यानंतर ३ सामने झाले. २०११ मध्ये सामना बरोबरीत सुटला होता. तर २०१९ मध्ये इंग्लंडने ३१ धावांनी पराभव केला होता. मात्र आता तिसऱ्या सामन्यात भारताने शानदार पद्धतीने विजय मिळवला. विश्वचषकात भारताविरुद्ध १०० धावांनी झालेला हा लाजिरवाणा पराभव इंग्लंड कधीही विसरू शकणार नाही.

    भारताच्या संघाने यापूर्वी २००३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८२ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यातही भारताच्या संघाने गोलंदाजी निर्णायक ठरली होती. माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने त्या सामन्यात २३ धावांत तब्बल सहा जणांना माघारी भारताच्या संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. त्याच विजयाची आठवण करून देईल, अशी कामगिरी रविवारी इंग्लंडविरुद्ध शमी आणि बुमराहने केली. दोघांनी सात विकेट घेताना इंग्रजांच्या दांड्यांवर दांड्या गुल केल्या.

    वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण ९ एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने ४ जिंकले आहेत. इंग्लंडने केवळ चार सामने जिंकले. तर एक सामना बरोबरीत सुटला होता. एकूण एकदिवसीय सामन्यांमध्ये, भारताने इंग्लंडशी १०७ सामने खेळले, त्यापैकी ५७ सामने जिंकले. तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले. २ सामने बरोबरीत आणि ३ अनिर्णित राहिले. या विजयानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरीत जवळपास प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ शर्यतीतून बाहेर पडला आहे.