न्यूझीलंडचा इंग्लडवर 9 विकेट्सने दणदणीत विजय; डेव्हिड कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांनी शतकी खेळीने मोठा विजय

  England vs New Zealand live score : न्यूझीलंडने 283 धावांचे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडचे दोन शिलेदार डेव्हीड कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांनी मोटी खेळी करीत न्यूझीलंडला मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात या दोघांनी न्यूझीलंडला सहज विजय प्राप्त करून दिला. मागील विश्वविजेत्या संघाला अक्षरशः नेस्तनाबूत करून टाकले. इंग्लडच्या गोलंदाजांची धुलाई करीत मोठी धावसंख्या उभारली. क्रिस वोक्स, सॅम कुरण, मार्क वूड, मोईन अली, अदिल रशीद, लेईम लिव्हिंगस्टोन एकाही गोलंदाजाला या धुरधंर फलंदाजांनी सोडले नाही. मार्क वूड, मोईन अली यांना 10 च्या रनरेटने धावा कुटल्या.

  क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड यांच्या सामन्यात इंग्लडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 282 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडसमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  लक्ष्याचा पाठलाग करताना कॉनवे आणि रचिन या दोघांनीही न्यूझीलंडसाठी शतके पूर्ण केली. डेव्हन कॉनवेने 121 चेंडूत 152 धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय रचिनने 96 चेंडूत 123 धावा करून नाबाद राहिला. कॉनवे आणि रचिन यांनी विश्वचषक पदार्पणाच्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली

  आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात विशेष झाली नाही. विल यंग खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे यांनी जबाबदारी स्वीकारली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांचा नाश केला.

  डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र हे दोघेही न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करत होते. यासह, विश्वचषकात पहिल्यांदाच असे घडले जेव्हा एकाच संघातील दोन खेळाडूंनी पदार्पणाच्या विश्वचषकात शतके झळकावली आणि संघाला विजयापर्यंत नेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रचिन रवींद्रचे हे पहिले शतक होते. कॉनवेने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले.

  विश्वचषकात न्यूझीलंडची सर्वात मोठी भागीदारी

  डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी विश्वचषकात न्यूझीलंडचे सर्व विक्रम मोडीत काढले. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी २७३ धावांची भागीदारी झाली. विश्वचषकात न्यूझीलंडसाठी कोणत्याही विकेटवरील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी हा विक्रम जर्मोन आणि हॅरिस यांच्यात १९९६ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता.

  एवढेच नाही तर डेव्हॉन कॉनवे वनडे विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करताना 150 हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आणि तो नाबाद राहिला. या प्रकरणात, कॉनवेने 2015 च्या विश्वचषकात 139 धावांची नाबाद खेळी खेळलेल्या श्रीलंकेच्या लाहिरू थिरिमानेचा विक्रम मोडला.

   

  इंग्लंड क्रिकेटचे सोनेरी पिढीचे क्रिकेटपटू

  पांढर्‍या चेंडूच्या क्रिकेटची व्याख्या बदलणारे इंग्लंड क्रिकेटचे सोनेरी पिढीचे क्रिकेटपटू आज दुखापतग्रस्त न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करत आहेत.

  गतविजेते 2019 च्या अंतिम फेरीची पुनरावृत्ती

  गतविजेते 2019 च्या अंतिम फेरीची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य ठेवतील. इंग्लंडचा संघ तरुण नसून जोस बटलरच्या नेतृत्वाखाली तिसरा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. इंग्लंडने टी-20 विश्वचषकही जिंकला.

  आयसीसी विश्वचषक जिंकू शकलेला नाही

  दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ अद्याप आयसीसी विश्वचषक जिंकू शकलेला नाही आणि त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. सराव सामना खेळूनही कर्णधार केन विल्यमसन पहिला सामना खेळत नाही, तर वेगवान गोलंदाज टीम साऊथीही पहिल्या सामन्यात उपलब्ध नाही. शस्त्रक्रियेनंतर दोघेही पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत.