हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यावर पाहिल्याचं दिली प्रतिक्रिया

हार्दिकची ही एक्स पोस्ट अल्पावधीतच सुमारे १ लाख लोकांनी पाहिली. यासोबतच १८ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे.

    वर्ल्ड कप 2023 – हार्दिक पांड्या : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या २०२३ च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. पुण्यात बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. पांड्याने याद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला टीम इंडियात स्थान मिळाले आहे.

    पांड्याने X वर एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ”विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमध्ये मी खेळू शकणार नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मी उत्कटतेने संघासोबत असेन आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर मी त्यांचा जयजयकार करेन. तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. ही टीम माझ्यासाठी खूप खास आहे आणि मला खात्री आहे की आमच्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल.

    हार्दिकची ही एक्स पोस्ट अल्पावधीतच सुमारे १ लाख लोकांनी पाहिली. यासोबतच १८ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. पांड्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय आहे की बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये हार्दिक सहभागी झाला नव्हता.