
सध्याचा भारतीय संघ पाहिला तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. इशानने दोन सामने खेळले असून यादरम्यान त्याने द्विशतक झळकावले आहे.
वर्ल्ड कप २०२३ भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना १९ ऑक्टोबर रोजी पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये होणार्या या सामन्यासाठी भारताचा संघ पूर्णपणे तयार आहे. भारताच्या संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत. बांग्लादेशला त्याच्याशी स्पर्धा करणे सोपे जाणार नाही. एकदिवसीय सामन्यांची आकडेवारी पाहिली तर भारताचा वरचष्मा दिसतो. विराट कोहलीचा बांग्लादेशविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. या सामन्यातही तो चमत्कार करू शकतो.
खरे तर भारताकडून फलंदाजी करताना बांग्लादेशविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्याने १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८०७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ४ शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या १३६ धावा आहे. या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने १६ सामन्यात ७३८ धावा केल्या आहेत. रोहितने बांग्लादेशविरुद्धच्या वनडेमध्ये ३ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. रोहितची सर्वोत्तम धावसंख्या १३७ धावा आहे.
सध्याचा भारतीय संघ पाहिला तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. इशानने दोन सामने खेळले असून यादरम्यान त्याने द्विशतक झळकावले आहे. ईशानने एकूण २१५ धावा केल्या आहेत. या कालावधीत एका डावात २१० धावा केल्या आहेत. केएल राहुलने या कालावधीत ५ सामने खेळले असून १९१ धावा केल्या आहेत. बांग्लादेशविरुद्धच्या भारतीय गोलंदाजांच्या वनडे विक्रमावर नजर टाकली तर अजित आगरकर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. आगरकरने 8 सामन्यात १६ विकेट घेतल्या आहेत. रवींद्र जडेजा सध्याच्या संघात अव्वल असून एकूण यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जडेजाने १२ सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने ४ सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. यावेळीही बुमराह एक्स फॅक्टर ठरू शकतो.