महामुकाबल्यासाठी भारतीय सेना अहमदाबादमध्ये दाखल, भारताचं पुढील लक्ष्य तिसरा विजय…

भारत विरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला १४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. हा हायव्होल्टेज सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.

    वर्ल्ड कप २०२३ – भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताचा संघ वर्ल्ड कप २०२३ मध्ये चांगल्याच फॉर्म मध्ये दिसत आहे. भारताच्या संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत विजयी मिळवले. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत केले तर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा धुराळा उडवला. आता भारताचा संघ तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानसोबत दोन हात करण्यासाठी भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीने भारताचा संघ अफगाणिस्तानच्या विरुद्ध आठ विकेट्स आणि १५ षटके राखून पराभूत केले. आज ४ वाजण्याच्या आसपास भारतीय संघ अहमदाबाद विमानतळावर दाखल झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    भारत विरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला १४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. हा हायव्होल्टेज सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ आधीच अहमदाबादमध्ये दाखल झाला. आज भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ लवकरच सरावाला सुरुवात करेल.

    भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे, सलामी फलंदाज शुभमन गिल याने डेंग्यूवर मात केली आहे. त्याने सरावालाही सुरुवात केली आहे. शुभमन गिल याने एक तासांपेक्षा जास्त वेळ नेट्समध्ये सराव केला. पाकिस्तानविरोधात शुभमन गिल खेळल्यास भारताची ताकद आणखी वाढणार आहे.