रोहित शर्माचा रेकॉर्ड काही वेळा पुरताच, कर्णधार रोहित शर्माचा रेकॉर्ड चक्क… श्रेयस अय्यरने मोडला

चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरने २३ चेंडूत २५ धावा केल्या. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

    वर्ल्ड कप २०२३ : सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारताची कामगिरी दमदार राहिली. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये कांगारूंचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने दमदार फलंदाजी करून गोलंदाजांचा धुराळा उडवला. आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळाडूंनी ज्या प्रकारची कामगिरी दाखवली, त्यावरून आगामी काळातही हा कारवाँ इथेच थांबणार नसल्याचे दिसत आहे.

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पार पडलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली आणि केएल राहुलने दमदार खेळी केली. अफगाणिस्तानविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने आपल्या ताकद दाखवली. पण, या सामन्यात रोहित शर्माने केलेला विक्रम श्रेयस अय्यरने अवघ्या काही तासाभरात मोडला. आयसीसी वर्ल्डकप २०२३ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावून अनेक विक्रम मोडीत काढले, तर इशान किशननेही ४७ चेंडूत ४७ धावांची दमदार खेळी केली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने ५६ चेंडूत ५५ धावा केल्या.

    चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरने २३ चेंडूत २५ धावा केल्या. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. पण हा एक षटकार मारत श्रेयस अय्यरने नवा विक्रम रचला. त्याचा षटकार १०१ मीटर अंतराचा होता, जो यंदाच्या वर्ल्डकप मधला सर्वात लांब षटकार होता. विशेष म्हणजे याच्या काही वेळापूर्वी रोहित शर्माने ९३ मीटर लांब षटकार ठोकला होता, मात्र श्रेयस अय्यरने त्याच्या कर्णधाराचा विक्रम तोच उद्ध्वस्त केला. वनडे वर्ल्डकप २०२३ मधील सर्वात लांब षटकार बद्दल बोलायचे झाले तर, श्रेयस अय्यर १०१ मीटर लांब षटकार मारून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्मा ९३ मीटरचा षटकार ठोकून दुसऱ्या क्रमांकावर आहे.