वर्ल्ड कप फायनल-इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया : वर्ल्ड कप मध्ये दोन वेळचा चॅम्पियन भारताचा सामना पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आणि सर्व १० सामने जिंकून फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली. तर ऑस्ट्रेलिया पहिले २ सामने गमावल्यानंतर सलग ८ सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

टीम इंडियाला २०११ नंतर पहिल्यांदाच विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघाविरुद्ध हा पराक्रम करण्याची संधी आहे. यासोबतच २००३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचीही ही उत्तम संधी आहे.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, त्याने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. आणि मला प्रथम फलंदाजी करायची होती. ऑस्ट्रेलियन संघातही कोणताही बदल झालेला नाही.

दोन्ही संघाची प्लेइंग ११

भारतीय संघाची प्लेइंग ११
रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११
ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (डब्ल्यू), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (क), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.