
भारताने नेपाळवर शानदार विजय मिळवल्यामुळं गुणतालिकेतील समीकरणं बदलली असून, भारताने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. आशिया कप 2023 साठी ए ग्रुपमधून दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. पाकिस्तान आणि टीम इंडियाने सुपर 4 साठी क्वालिफाय केलं आहे. त्यामुळं आता भारत पाकिस्तान रविवारी पुन्हा एकदा भिडणार आहेत.
कोलंबो : क्रिकेटप्रेमीसाठी पुन्हा एकदा पर्वणी व आनंदाची बातमी म्हणजे आशिया स्पर्धेत (Asia cup 2023) पुन्हा एकदा भारत पाकिस्तान (INDIA Vs PAKISTAN) भिडणार आहेत. भारत पाकिस्तानच यांच्यातील हायहोल्टज महामुकाबला शनिवारी पावसामुळं वाया गेला. त्यामुळं (रविवारी, 10 सप्टेंबर) च्या सामन्याकडे संपूर्ण क्रिडाप्रेमीचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात पाकिस्ताननं नेपाळवर विजय मिळवला आहे. आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिला पाकिस्तानसोबत होता. पण हा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळं क्रिकेटप्रेमींचा मूड ऑफ झाला. मात्र काल भारताने नेपाळवर शानदार विजय मिळवल्यामुळं गुणतालिकेतील समीकरणं बदलली असून, भारताने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. आशिया कप 2023 साठी ए ग्रुपमधून दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. पाकिस्तान आणि टीम इंडियाने सुपर 4 साठी क्वालिफाय केलं आहे. त्यामुळं आता भारत पाकिस्तान रविवारी पुन्हा एकदा भिडणार आहेत. (World War Again on the Cricket Ground; When is the high voltage match between India and Pakistan? Where and how can you watch the match)
भारत-पाकिस्तान सामना कधी?
दरम्यान, आता ए ग्रुपमधील हे दोन्ही संघ पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध दोन हात करणार आहेत. रविवारी 10 सप्टेंबर रोजी हा सामना श्रीलंकेतील कोलंबो इथे पार पडणार आहे. याआधीच्या सामन्यात पावसामुळे पाकिस्तानला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती. आता 10 तारखेला पुन्हा सामना होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
विराट कोहली विरुद्ध बाबर
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की, क्रिक्रेटप्रेमीचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. तर काही मिनिटातच ऑनलाईन तिकिटांची विक्री होती. क्रीडाप्रेमी सुट्टी टाकून सामन्याचा आनंद घेतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष होते. शनिवारचा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकला नसल्यामुळं या सामन्याची सर्वांना उत्सुकहा होती. हा सामन्यात दोन्ही संघाकडून आकर्षण असेल ते म्हणजे विराट कोहली व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम. पहिल्या सामन्यात विराट कोहलीला फारशी चमक दाखवता आली नाही. फक्त चार धावांवर कोहली बाद झाला. मात्र बाबरला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं या दोघांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
आकडेवारी काय सांगते?
भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना म्हटलं की, मैदानावरील जणू युद्धच… विश्वचषकाचा इतिहास पाहता, भारताने पाकिस्तानला सतत पराभूत केले आहे. आकडेवारी पाहता टीम इंडियाच पाकिस्तानवर वरचढ आहे. आशिया कपच्या इतिहासात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा एकूण 14 वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर पाकिस्तानने 5 वेळा भारताचा पराभव केल आहे. 2 सामन्याचा निकाल लागला नाही. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात भारत पाकिस्तान टी-टेव्टी सामन्यात भिडले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १६० धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना भारताची भक्कम फलंदाजी ढेपाळली मात्र भारत पराभूतच्या छायेत असताना, विराट कोहलीने विक्रमी खेळी करत भारताला अभूतपूर्व व ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
भारतीय संभाव्य टीम – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)
पाकिस्तान संभाव्य टीम – बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.