कुस्तीपटू सुशील कुमार यांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने तारीख पुढे ढकलली ; तिहार जेलमध्ये केली रवानगी

दिल्ली कोर्टाने छत्रसाल स्टेडियममध्ये एका तरूण पहेलवानाच्या हत्या प्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमार यांची ९ जुलैपर्यंत तारीख पुढे ढकलली आहे. कुमार यांच्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा अवधी समाप्त झाल्यानंतर शुक्रवारी मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट मयंक अग्रवाल यांच्यासमोर सादर करण्यात आले.

    नवी दिल्ली: सागर धनकर हत्या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला ऑलिंपिक पदक विजेता पहेलवान सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केली. पोलिसांनी सुशील कुमारच्या साथीदारालादेखील अटक केली आहे. परंतु दिल्ली कोर्टाने छत्रसाल स्टेडियममध्ये एका तरूण पहेलवानाच्या हत्या प्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमार यांची ९ जुलैपर्यंत तारीख पुढे ढकलली आहे. कुमार यांच्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा अवधी समाप्त झाल्यानंतर शुक्रवारी मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट मयंक अग्रवाल यांच्यासमोर सादर करण्यात आले.

    आरोपी वकील यांच्या मते, कुमार यांची रवानगी मंडोली तुरूंगातून तिहार तरूगांत करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादावरून कुमारने आपल्या काही सहकार्यांसोबत मिळून ४ आणि ५ मेच्या मध्यरात्री स्टेडियममध्ये सागर धनकर आणि त्याच्या दोन मित्रांची मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर धनकर (२३) यांचा जखमांमुळे मृत्यू झाला.

    पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, सुशील कुमार हा ह्त्या प्रकरणात मुख्य आरोपी आणि मास्टरमाइंड आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून समोर आलेल्या फुटेजनुसार कुमार आणि त्यांचे सहकारी सागर धनकरला मारहाण करताना दिसत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कोर्टाने सुशील कुमार यांच्या विशेष खाण्याची मागणी फेटाळून लावली आहे. यामध्ये आरोग्य आणि फिटनेसशी निगडीत असलेले पदार्थ म्हणजेच हेल्थ स्पलिमेंट्ंस , ओमेगा – ३ कॅप्सूल, जॉइंटमेंट कॅप्सूल, प्री-वर्कआउट सी ४, हायड, मल्टीविटामिन जीएनसी यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. कुस्तीची कारकीर्द चालू ठेवण्यासाठी त्यांना ह्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.