कुस्तीपटू मोहित ग्रेवलनने आणि दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक

    राष्ट्रकुल स्पर्धेचे (Commonwealth Games 2022)मैदान आठव्या दिवशी भारताच्या कुस्तीपटूंनी गाजवले असून भारताच्या खात्यात कुस्तीपटूंनी ६ पदकांची भर पडली आहे. यात अनेक दिग्गज कुस्तीपटूनसह मोहित ग्रेवल (Mohit Grewal) आणि दिव्या काकरान (Divya Kakran) याचा ही समावेश झाला आहे. मोहित ग्रेवल राष्ट्रकुल स्पर्धेच्या पुरुषांच्या १२५ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे. तर महिलांच्या ६८ किलोग्राम वजनी गटात दिव्या काकरनने कांस्य पदक (Bronze Medal) जिंकले.

    भारताच्या सर्वच कुस्तीपटूंनी शुक्रवारी कमाल कामगिरी केली. सुरुवातीपासून विजय मिळवणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये महिला कुस्तीपटू दिव्या काकरान आणि मोहित ग्रेवल पराभूत झाले. पण दोघांनीही कांस्य पदकाच्या सामन्यात विजय मिळवला आहे.

    भारताने महिलांच्या ६८ किलोग्राम वजनी गटात दिव्या काकरनच्या मदतीने कांस्य पदक मिळवले. आधीच्या सामन्यात पराभूत झालेल्या दिव्याने तिसऱ्या स्थानासाठीचा सामना जिंकत कांस्य मिळवलं आहे. तिने टोंगाच्या टायगर लिली कॉकर लेमाली हिला मात देत पदक जिंकले. तर मोहितने १२५ किलो वजनी गटात जमाईकाच्या आरॉन जॉन्सनला (Aaron Johnson) मात देत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या २६ वर गेली आहे.