यशस्वी जयस्वालचा ‘डबल धमाका’, इंग्लंडच्या गोलंदाजांची उडाली झोप

यशस्वीने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुहेरी शतक पूर्ण केले. आज येताच त्याने आक्रमक फलंदाजी करत शानदार चौकार मारून आपले द्विशतक पूर्ण केले.

  भारतीय संघाचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल विशाखापट्टणम कसोटीत दमदार फलंदाजी करताना दिसत आहे. या सामन्यात त्याने इंग्लिश गोलंदाजांना पराभूत केले आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. यशस्वीने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुहेरी शतक पूर्ण केले. आज येताच त्याने आक्रमक फलंदाजी करत शानदार चौकार मारून आपले द्विशतक पूर्ण केले.

  यशस्वीसमोर इंग्लिश गोलंदाज फेल
  विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत यशस्वीची बॅट चांगलीच खेळली. इंग्लंडचा एकही गोलंदाज त्याच्यासमोर प्रभावी दिसत नाही. या सामन्यात यशस्वीने आतापर्यंत इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाला चीतपट केले आहे. एकीकडे इतर भारतीय फलंदाजांना इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना त्रास होत आहे, तर दुसरीकडे यशस्वी सर्व इंग्लिश गोलंदाजांना अगदी सहज खेळवत आहे.

  यशस्वी जयस्वालच्या खेळीचे सोशल मीडियावरही खूप कौतुक होत आहे. चाहते या फलंदाजाला भारताचा पुढचा सुपरस्टार म्हणत आहेत. यशस्वी जयस्वालने भारतीय डावाच्या 102 व्या षटकात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले.

  गांगुली आणि कांबळी यांच्या स्पेशल क्लबमध्ये केला प्रवेश
  या द्विशतकासह यशस्वी जयस्वाल भारताचा चौथा तिसरा डावखुरा फलंदाज बनला आहे. ज्याने भारतात कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले आहे. भारतात इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळताना द्विशतक झळकावणारा यशस्वी हा भारताचा दुसरा डावखुरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विनोद कांबळीने इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती.

  भारतामध्ये कसोटी खेळताना द्विशतक झळकावणारा डावखुरा भारतीय फलंदाज

  विनोद कांबळी – 227धावा विरुद्ध झिम्बाब्वे, 1993 (दिल्ली)
  विनोद कांबळी – 224 धावा विरुद्ध इंग्लंड, 1993 (मुंबई)
  गौतम गंभीर – 206 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2006 (दिल्ली)
  सौरव गांगुली – 239 धावा विरुद्ध पाकिस्तान, 2007 (बेंगळुरू)
  यशस्वी जैस्वाल – 209* धावा विरुद्ध इंग्लंड, 2024 (विशाखापट्टणम)