सिक्सर किंग युवराज सिंगनं ख्रिस गेलला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

ख्रिस गेल आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्सकडून खेळत आहे. आज राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेल खेळणार आहे. या सामन्यापूर्वी युवराजने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ख्रिस गेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  भारतीय संघाचा सिक्सर किंग युवराज सिंगनं (Yuvraj Singh )  वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ख्रिस गेलचा आज ४२ वा वाढदिवस आहे. ख्रिस गेल (Chris Gayle) आणि युवराज सिंग यांची(YUVI AND GAYLE BOTH ARE BEST FRIENDS)  चांगली मैत्री आहे. युवराज आणि गेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघात एकत्र खेळत होते. एकत्र रुम शेअर केले आहेत. दोन्ही खेळाडू आपल्या मजेशीर अंदाजात सोशल मीडियावर व्यक्त होत असतात.(Yuvraj Singh gave Happy Birthday wish to Chris Gayle)

  ख्रिस गेल आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्सकडून खेळत आहे. आज राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेल खेळणार आहे. या सामन्यापूर्वी युवराजने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ख्रिस गेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याने म्हटलं की, युनिवर्स बॉस ख्रिस गेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एमजे मूव्ह्ससह कितीतरी रात्र गाजवल्या. तुला नक्की खात्री आहे का विराट माझ्यापेक्षा चांगलं नाचतो?,अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर युवराज सिंगने केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)