Yuvraj Singh will contest the election? Yuvi's big decision after Gautam Gambhir's political retirement; Self-proclaimed political role

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाकडून कधीही तारखांची घोषणा होऊ शकते. असं असताना आता राजकीय पटलांवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे, भाजपा खासदार गौतम गंभीर याने राजकारणाला रामराम ठोकला. तर युवराज सिंगने आपल्या राजकीय भवितव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

  मुंबई : लोकसभा निवडणुकीचं रणशिंग सर्वच राजकीय पक्षांनी फुंकले आहे. निवडणून आयोगाने तारखा जाहीर करण्याआधीच राजकीय नेते घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत. काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली असून, तयारीला सुरुवात केली आहे. त्यात पक्षांना सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षाची कास धरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
  खासदार गौतम गंभीर याच्या राजीनाम्याने खळबळ
  आज या पक्षात असलेले नेते उद्या त्या पक्षात जात आहेत. असे सर्व सुरु असताना माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. गौतम गंभीरने सोशल मीडियावर जाहीरपणे राजकारणातून बाहेर पडत असल्याचे सांगितले आहे.
  भाजपची धावपळ सुरू
  त्यामुळे दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्यासाठी भाजपची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवराज सिंग याची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे सनी देओलच्या जागी निवडणूक लढवणार अशी चर्चा रंगली आहे. यावर आता खुद्द युवराज सिंग याने स्पष्टीकरण दिलं आहे.
  पंजाबच्या गुरदासपूरमधून लोकसभेसाठी रिंगणात
  मीडिया रिपोर्टनुसार, युवराज सिंग पंजाबच्या गुरदासपूरमधून लोकसभेसाठी रिंगणात उतरणार आहे, असा दावा केला जात आहे. या सीटवर भाजपाकडून सनी देओल याला उमेदवारी मिळाली होती. तसेच विजयी होत लोकसभेत खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या सर्व चर्चांवर युवराज सिंग याने पडदा टाकला आहे. “राजकारणात येण्याची माझी कोणतीच इच्छा नाही. मी समाजासाठी काम करू इच्छितो. त्यासाठी राजकारणात उतरण्याची गरज नाही. मीडिया रिपोर्ट चुकीचे आहेत. मी गुरूदासपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. मी लोकांची मदत करू इच्छितो. मी हे काम युवी कॅन फाउंडेशनच्या माध्यमातून करेन. आपल्या स्तरावर कोणला तरी असं करण्याची गरज आहे.”
  युवराज सिंगच्या निर्णयाने चाहत्याने व्यक्त केला आनंद
  युवराज सिंग याच्या निर्णयानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आह. एका युजर्सने लिहिलं आहे की, धन्यवाद युवराज, खरंच खूप छान निर्णय घेतला. राजकीय दलदलीत पडण्यात काहीच अर्थ नाही. तुझ्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. दुसऱ्या चाहत्याने लिहिलं की, राजकारणासाठी आम्ही एक क्रिकेट हीरो गमवू इच्छित नाही. तिसऱ्या युजर्सने लिहिलं की, खरं तर राजकारणात तुझ्यासारख्या लोकांची गरज आहे. पण सरतेशेवटी तुझा निर्णय आहे. त्याचा आम्ही सन्मान करतो.