युझवेंद्र चहलने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केले खास फोटो

चहलने धनश्रीसोबतचे चार फोटो शेअर केले आहेत. ही बातमी लिहेपर्यंत X वर ३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

    युझवेंद्र चहल – धनश्री वर्मा : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहलने अनेक प्रसंगांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. चहलने अनेक मोठ्या प्रसंगी टीम इंडियासाठी घातक गोलंदाजी केली आहे. तो त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. आज युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. चहलची पत्नी धनश्री वर्माही सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. चहल आणि धनश्रीची जोडी चाहत्यांनाही आवडते. चहलने पत्नी धनश्रीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

    चहलने X वर धनश्रीसोबतचे काही मनोरंजक फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रिय पत्नी, आमच्या भेटीच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत या प्रवासातील प्रत्येक क्षण माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. लोक म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात आणि मला खात्री आहे की ज्याने आमची स्क्रिप्ट लिहिली आहे तो माझ्या बाजूने आहे. तुझ्यामुळे मी एक चांगला माणूस झालो आहे. तुझ्यामुळे मी पूर्ण झालो आहे.”

    चहलने धनश्रीसोबतचे चार फोटो शेअर केले आहेत. ही बातमी लिहेपर्यंत X वर ३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनेकांनी ते रीशेअर केले आहे. चहल आणि धनश्रीच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय आहे की चहल आणि धनश्रीने २०२० मध्ये लग्न केले होते.