आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ७ हजार ५ कोटींची उपमुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

नगर पंचायती आणि नगरपरिषदांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ७ हजार ५ कोटींची घोषणा करण्यात आली आहे. तसेच आरोग्यसेवेसाठी ७ हजार कोटींचा प्रकल्प प्रस्तावित असून, कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज असल्याचं अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून सांगितलं आहे.

    राज्याचा अर्थसंकल्प आज (सोमवार) विधानसभेत सादर केला जात आहे. हा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर केला जात आहे. यावेळी नगर पंचायती आणि नगरपरिषदांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ७ हजार ५ कोटींची घोषणा करण्यात आली आहे. तसेच आरोग्यसेवेसाठी ७ हजार कोटींचा प्रकल्प प्रस्तावित असून, कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज असल्याचं अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून सांगितलं आहे.

    जिल्हा रुग्णालये, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार येणार. मनपा, नगर परिषदा, नगरपंचायतीत सरकार आरोग्य पायाभूत सुविधा उभारणार. मनपा क्षेत्रांसाठी ५ वर्षात ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, यंदा ८०० कोटी देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

    आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवणार. मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार. आरोग्य विभागास यंदा २९०० कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. तर वैद्यकीय शिक्षण विभागास १५१७ कोटी देणार, असं अजित पवार म्हणाले.