महाराष्ट्राच्या पर्यटन विभागासाठी १ हजार ३६७ कोटी रुपयांची तरतूद

राज्याच्या पर्यटन विभागासाठी १ हजार ३६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्य विभागासाठी १२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी आणि लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारण्यात येणार आहे. वरळीच्या डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

    पर्यटन विभागासाठी १ हजार ३६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्य विभागासाठी १२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    दरम्यान, प्राचीन मंदिरांचे जतन करण्यात येणार असून ८ प्रचीन मंदिरांची निश्चिती करण्याचं ठरवलं आहे. त्याचप्रमाणे प्राचीन मंदिरांच्या जतनासाठी यंदा १०१ कोटी रुपयांची मोठी घोषणा अजित पवारांनी केली आहे.