अर्थसंकल्प २०२१ (LIVE) | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट्स | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट7 महीने पहले

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट्स

ऑटो अपडेट
द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
15:16 PMMar 08, 2021

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

- जिल्हा वार्षिक योजनेसाठी ११ हजार ३५ कोटी रुपये

- राजकोशीय तूट - ६६ हजार कोटी

- पेट्रोल आणि डिझेलबाबत काहीही सवलत नाही

- व्हॅटमध्ये कुठलाही कपात नाही

15:05 PMMar 08, 2021

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

- दिव्यांगाचे ६ ऐवजी २१ प्रकार

- सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी सिंधुरत्न योजना

- सिंह आणि व्याघ्र सफारीची पुनर्रचना

- सिंधुदुर्गातील समुद्ररत्न योजनेसाठी ३०० कोटी

- संजय गांधी उद्यानातील सफारीची पुनर्रचना करणार

हे सुद्धा वाचा

15:00 PMMar 08, 2021

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

-  स्व. गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाला मदत

- उसाला प्रतिटन १ रुपये कारखान्यांकडून जमा करणार

- ७ प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी १०१ कोटी

- तृतीयपंथियांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करणार

- आश्रम शाळांचं आधुनिकीकरण करणार

14:53 PMMar 08, 2021

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

- जव्हार गिरीस्थान पर्यटनस्थळ होणार

- पालघर समुद्र किनाऱ्याच्या विकासासाठी लक्ष देणार

- पुण्यात साखर संग्रहालय उभारणार

- प्राचीन मंदिरांचं जतन करणार, पहिल्या टप्प्यात राज्यातील ८ मंदिरांची निवड

14:46 PMMar 08, 2021

महिलांसाठी विशेष योजना

राज्यातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी प्रवासाची सवलत घोषित केली आहे. त्यासाठी विशेष महिला बसदेखील सुरु करण्यात येणार आहेत. महिलांच्या नावे घर व्हावं, यासाठीदेखील एका विशेष योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय. महिलेच्या नावाने घराची नोंदणी केली, तर मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. 

14:44 PMMar 08, 2021

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

- २०२५ पर्यंत २५ हजार मेगावॅट अपारंपारिक ऊर्जानिर्मिती

- बाळासाहेब ठाकरे स्मारक ४०० कोटी

- घरांवर महिलांचा न्याय.. राजमाता जिजाऊ योजना

- महिलेच्या नावावर घराची नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कात मिळणार सवलत

14:43 PMMar 08, 2021

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

- मुंबई इस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर सायकलींसाठी स्वतंत्र मार्गिका

- मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत स्वतंत्र जलमार्ग स्थापन करणार

- मुंबईतील किनारी मार्ग २०२४ पूर्वी पूर्ण करणार

- मीठी नदी पुनर्जिवीत करण्याच्या प्रकल्पासाठी ४०० कोटींची तरतूद

14:31 PMMar 08, 2021

पुणे नगर नाशिक रेल्वेची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या पुुणे-नगर-नाशिक या जलद रेल्वेची घोषणा केलीय. या रेल्वेला  २३५ केंद्रे असणार आहेत. एकूण २४ थांबे या रेल्वेला असतील, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलीय. 

14:25 PMMar 08, 2021

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

- २६ पैकी १३ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करणार

- गोसीखुर्द १ हजार कोटी, २०२३ पर्यंत पूर्ण करणार

- जलसंपदा विभागाला १२ हजार कोटी

- कृषीपंप आणि सौरउर्जा सुधारणा कामांसाठी महावितरणाला १५०० कोटी रुपये प्रस्तावित

- समृद्धी महामार्ग ४४ टक्के काम पूर्ण झाले

- १ मेला शिर्डीपर्यंत खुला करणार

14:21 PMMar 08, 2021

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

- कर्जमाफी योजनेचा लाभ ३१ लाख शेतकर्‍यांना

- १९ हजार कोटींची कर्जमाफी दिली.

- कृषी पंप धोरणासाठी महावितरणला १५०० कोटी

- कृषीउत्पन्न बाजारसमितीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींची तरतूद

- शेतीमाल प्रक्रिया सुधारणेसाठी १ हजार कोटी

- २१-२२ या वर्षासाठी सहकार वस्त्रोद्योग विभागासाठी १२८४ कोटी रुपये प्रस्तावित

Load More

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा करू नका, असं सूचक विधान नुकतंच अर्थमंत्र्यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात नेमकं काय मांडलं जाणार, याची उत्सुकता आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यात केंद्र सरकारच्या सेससह राज्य सरकाराच्यां व्हॅटचा (Value Added Taxes) समावेश असतो. महागाईचा भडका उडत असताना राज्य सरकार व्हॅटमध्ये कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देणार का, याकडंही सर्वांच्या नजरा असतील.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२० सोमवार
सोमवार, सप्टेंबर २०, २०२१

पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.