Corona

मुंबई : आज राज्यात १०,२२६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५,६४,६१५ झाली आहे. तर आज १३,७१४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १३,३०,४८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.०४ % एवढे झाले आहे.

मुंबई : आज राज्यात(state) १०,२२६ नवीन कोरोना(corona) रुग्णांची नोंद झाली असल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५,६४,६१५ झाली आहे. तर आज १३,७१४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १३,३०,४८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.०४ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,९२,४५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आज ३३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ३३७ मृत्यूंपैकी १५३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागीलआठवडयातील आहेत. उर्वरित १३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३८ मृत्यू पुणे – ५१, सांगली -२६, नागपूर – १०, सातारा -८, चंद्रपूर -७, बुलढाणा – ५, सोलापूर -५, ठाणे – ५, वर्धा -३, उस्मानाबाद -३, अहमदनगर -२, गोंदिया -२, कोल्हापूर -२, लातूर -२, रायगड -२, यवतमाळ -२, जळगाव -१, कर्नाटक -१ आणि मध्य प्रदेश – १ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.

दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७९,१४,६५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,६४,६१५ (१९.७७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,२७,४९३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,१८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.