corona

आज राज्यात(state) कोरोनाबाधित(corona) आणि कोरोना मृत्यू दोन्ही घटल्याची नोंद करण्यात आली. आज १०,२४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून रोजची नोंद घटली असल्याचे समोर येत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४,५३,६५३ झाली आहे. तर आज १२,९८२ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आजपर्यंत एकूण ११,६२,५८५ करोना मुक्त झाले आहेत.

मुंबई: आज राज्यात(state) कोरोनाबाधित(corona) आणि कोरोना मृत्यू दोन्ही घटल्याची नोंद करण्यात आली. आज १०,२४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून रोजची नोंद घटली असल्याचे समोर येत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४,५३,६५३ झाली आहे. तर आज १२,९८२ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आजपर्यंत एकूण ११,६२,५८५ करोना मुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,५२,२७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आज २६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण २६३ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७२ मृत्यू पुणे – १७, कोल्हापुर- १२, नागपूर -९, जालना -९, यवतमाळ -७, सातारा – ५, ठाणे -५, नाशिक -२, रायगड – २, बीड – १, भंडारा -१, हिंगोली -१ आणि सांगली -१ असे आहेत. आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ३८३४७ एवढी झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७१,६९,८८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,५३,६५३ (२०.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,००,१६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.