corona

मुंबई: आज राज्यात(state) १०,२५९ कोरोनाबाधित(corona affected) रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५,८६,३२१ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण १,८५,२७० ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आज २५० मृत्यू झाले आहेत.

राज्यात आज दिवसभरात १४,२३८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १३,५८,६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर ८५.६५ टक्के इतका आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढली असून ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे.

आज राज्यात दिवसभरात २५० मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा ४१,९६ वर पोहोचला आहे. आज नोंद झालेल्या २५० मृत्यूंपैकी १५२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत तर उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवड्याहून अधिक कालावधीपुर्वीचे आहेत. मृत्यूंमध्ये ठाणे परिमंडळ ७९, पुणे १६७,नाशिक ११, कोल्हापूर २६,औरंगाबाद ७, लातूर मंडळ १७,अकोला मंडळ १० ,नागपूर ३३ येथील मृत्यूंचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ % एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८०,६९,१०० नमुन्यांपैकी १५,८६,३२१ ( १९.६६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,९५,५५२ लोकं होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.