राज्यात १०,३०९ नवे कोरोना रुग्ण, ३३४ जणांचा मृत्यू

मुंबई :  राज्यात १०,३०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,६८,२६५ झाली आहे. राज्यात १,४५,९६१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३३४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६ हजार ४७६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे. 

राज्यात ३३४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४२, ठाणे १३, कल्याण डोंबिवली मनपा २३, भिवंडी निजामपूर मनपा १८, रायगड १९, पनवेल मनपा १७, नाशिक १०, पुणे ७८, पिंपरी चिंचवड १४, सोलापूर ९, कोल्हापूर १२, अन्य राज्य १ यांचा समावेश आहे. आज ६,१६५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३,०५,५२१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २४,१३,५१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,६८,२६५ (१९.४० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४३,६५८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,४६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.