राज्यात १०,४२५ नवे रुग्ण, ३२९ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात १०,४२५ नवीन नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७,०३,८२३ झाली आहे. राज्यात १,६५,९२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३२९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २२७९४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

राज्यात ३२९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये मुंबई ३५, ठाणे १२, नवी मुंबई ८, उल्हासनगर ५, रायगड ३५, नाशिक ८, अहमदनगर ३, जळगाव १२, पुणे ४९, पिंपरी चिंचवड मनपा ९, सातारा ८, कोल्हापूर ३७, सांगली १५, औरंगाबाद २१, नागपूर २४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३२९ मृत्यूंपैकी २४१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४४ मृत्यू  हे औरंगाबाद १०, ठाणे १०, अहमदनगर ८, कोल्हापूर ६, नाशिक ३, पुणे ३, नागपूर २, लातूर १ आणि सातारा १ असे आहेत. आज १२,३००  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५,१४,७९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.१४ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७,२४,९११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,०३,८२३ (१८.८९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,५३,२७३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,६६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.