राज्यात १०,४४१ नवे रुग्ण, २५८ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात १०,४४१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,८२,३८३ झाली आहे. राज्यात १,७१,५४२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २२ हजार २५३ एवढी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.
राज्यात २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३४, ठाणे ५, नवी मुंबई ८, उल्हासनगर ७, नाशिक १०, अहमदनगर १२, पुणे ५१, पिंपरी चिंचवड मनपा १६, कोल्हापूर १३, सांगली ११, नागपूर २२ यांचा समावेश आहे. आज ८,१५७  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,८८,२७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६,१६,७०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,८२,३८३ (१८.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,३०,९८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,८२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.