राज्यात १०,४८३ नवे रुग्ण, ३०० जणांचा मृत्यू

मुंबई :राज्यात १०,४८३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४,९०,२६२ झाली आहे. तर १,४५,५८२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या १७ हजार ९२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४९ टक्के एवढा आहे. 

राज्यात ३०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४५, ठाणे १५, वसई विरार मनपा १४, रायगड ९, पनवेल मनपा १९, नाशिक २५, पुणे ५२, पिंपरी चिंचवड १८, सोलापूर ७, नागपूर १५ व अन्य राज्य १ यांचा समावेश आहे. आज १०,९०६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३,२७,२८१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६.७६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २५,६९,६४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,९०,२६२ (१९.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,८२,०७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,२६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.