राज्यात ११,०१५ नवे रुग्ण,२१२ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात ११,०१५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,९३,३९८ झाली आहे. राज्यात १,६८,१२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २१२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २२ हजार ४६५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ % एवढा आहे.

राज्यात २१२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई २०, ठाणे ११, उल्हासनगर मनपा १६, नाशिक ६, अहमदनगर ९, जळगाव १८, पुणे २०, सोलापूर १०, सातारा १०, कोल्हापूर ७, बीड ७, नागपूर १८ आणि अन्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण २१२ मृत्यूंपैकी १६४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २९ मृत्यू हे ठाणे ११, अहमदनगर ८, औरंगाबाद ३, जळगाव २, नाशिक २, पुणे २ आणि परभणी १ असे आहेत. आज १४,२१९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५,०२,४९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६,६३,४८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,९३,३९८ (१८.९२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,४४,०२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.