राज्यात दिवसभरात १११ जणांचा कोरोनाने घेतला बळी, ३५,९५२ नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान

आज दिवसभरात राज्यात(corona patients in maharashtra) १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे.

    राज्यात कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर कोरोना संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,६२,६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  आज  राज्यात २० हजार ४४४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण २२,८३,०३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.७८ टक्के एवढे झाले आहे.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.