मुंबईत आज १,१२५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, ४२ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत आज १,१२५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या १,१९,२५५ झाली आहे. तर आज ४२ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ६,५८८ वर पोहोचला आहे. मुंबईत आज ७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा ७७ टक्के इतका आहे.                                                

मुंबईत आज नोंद झालेल्या ४२ मृत्यूंपैकी ३१ जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३० पुरुष तर १२ महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी २४ रुग्ण ६० वर्षावरील होते तर १८ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.                   

मुंबईत संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण ६७१ नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत ८४,६४४ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज ७११ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत ९१,६७३ रुग्णांना घरी सोडण्यात आले.                                                         

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा ८० दिवसांवर गेला आहे. तर ४ जुलैपर्यंत एकूूूण ५,६७,०३१  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर २९ जुलै ते ४ ऑगस्ट जुलै दरम्यान कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.८७ इतका आहे.