राज्यात ११,५१४ नवे कोरोना रुग्ण, ३१६ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात ११,५१४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,७९,७७९ झाली आहे. राज्यात १,४६,३०५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३१६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६७९२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे. 

राज्यात ३१६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५७, ठाणे ३८, नाशिक १३, जळगाव १३, पुणे ४३, पिंपरी चिंचवड १९, सोलापूर १५, कोल्हापूर १३, नागपूर १८ यांचा समावेश आहे. आज १०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३,१६,३७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २४,८७,९९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,७९,७७९ (१९.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,७६,३३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,७६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.