राज्यात १२,६०८ नवे रुग्ण, ३६४ जणांचा मृत्यू

मुंबई : आज राज्यात १२,६०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५,७२,७३४ झाली आहे. राज्यात १,५१,५५५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या १९ हजार ४२७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे. 

राज्यात ३६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४७, ठाणे २४, नवी मुंबई मनपा १३, कल्याण डोंबिवली मनपा ४, वसई विरार मनपा ७, रायगड ८, नाशिक १८, जळगाव १२, पुणे ८७, पिंपरी चिंचवड मनपा १३, सातारा ७, कोल्हापूर १४, सांगली १९, औरंगाबाद ९, बीड ९, नागपूर १८ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३६४ मृत्यूंपैकी २७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४१ मृत्यू ठाणे जिल्हा १६, सांगली ७, पुणे ६, रायगड ३, बीड २, कोल्हापूर १, नागपूर १, रत्नागिरी १ सोलापूर १, जळगाव १, लातूर १ आणि नाशिक १ असे आहेत. आज १०,४८४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,०१,४४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३०,४५,०८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,७२,७३४ (१८.८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,३२,१०५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,३८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.