राज्यात १२,६१४ नवे रुग्ण, ३२२ जणांचा मृत्यू

राज्यात १२ हजार ६१४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५,८४,७५४ झाली आहे. राज्यात १,५६,४०९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई :  राज्यात १२ हजार ६१४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५,८४,७५४ झाली आहे. राज्यात १,५६,४०९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, १९ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३८ टक्के एवढा आहे. 

राज्यात आज ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४८, ठाणे २५, कल्याणे डोंबिवली मनपा ११, मीरा भाईंदर मनपा १०, पालघर १२, नाशिक १०, पुणे ५९, पिंपरी चिंचवड मनपा १४,  कोल्हापूर १२, जालना १०, नागपूर १९ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३२२ मृत्यूंपैकी २२६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४३ मृत्यू ठाणे जिल्हा २२, पुणे ८, नाशिक ३, रायगड ३, सांगली २, पालघर १,उस्मानाबाद १,लातूर १, जालना १ आणि बुलढाणा १ असे आहेत. आज ६,८४४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,०८,२८६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३१,११,५१४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,८४,७५४ (१८.७९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,४४,९७४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,५२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.