राज्यात १३,१६५ नवे रुग्ण, ३४६ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात १३,१६५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६,२८,६४२ झाली आहे. राज्यात १,६०,४१३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, २१ हजार ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे. 

राज्यात ३४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४६, ठाणे १४, नवी मुंबई ८, कल्याण डोंबिवली मनपा १२, पालघर ८, जळगाव ९, पुणे ५९, पिंपरी चिंचवड २७, सोलापूर १५, सातारा ९, कोल्हापूर १५, सांगली १८, यवतमाळ १०, नागपूर २६, अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३४६ मृत्यूंपैकी २४९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३८ मृत्यू ठाणे जिल्हा १५, पुणे ९, रायगड ४, कोल्हापूर २, जळगाव २, सांगली २, उस्मानाबाद १, सोलापूर १, पालघर १ आणि परभणी १असे आहेत.  आज ९,०११ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,४६,८८१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३३,३७,८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,२८,६४२ (१८.८३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,६२,४५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,०९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.