bmc

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या विनय तिवारी या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याने बिहार पोलिसांनी बृहन्मुंबई महापालिकेवर टीका केली. मात्र या प्रकरणानंतर महापालिकेने १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम सक्तीचा केला आहे. त्या संदर्भातला आदेश मुंबई महापालिकेने काढला आहे.

राज्य सरकारने कोरोनासंदर्भात काढलेल्या आदेशाचा दाखला देत मुंबई महापालिकेने मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला १४ दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत दाखल झालेले शासकीय अधिकारी ओळखपत्र दाखवून क्वारंटाईनपासून सुटका मिळवत आहेत. मात्र आता शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर जर बाहेर पडायचं असेल तर परवानगी घ्यावी लागणार असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.