आंध्र प्रदेशमध्ये सरकारी कोविड रुग्णालयात १४ रुग्णांचा मृत्यू, जिल्हा प्रशासनाने फेटाळला ऑक्सिजन तुटवड्यामुळे दुर्घटना झाल्याचा दावा

आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील एका सरकारी कोविड रूग्णालयात शनिवारी १४ रूग्णांचा मृत्यू(14 patients death in andhra pradesh) झाल्याचं समोर आलं आहे.

    देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. अशातच आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथील सरकारी कोविड रूग्णालयात शनिवारी १४ रूग्णांचा मृत्यू(14 patients death in andhra pradesh) झाल्याचं समोर आलं आहे. ऑक्सिजन अभवी रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, हा आरोप फेटाळत रूग्णांचे मृत्यू ऑक्सिजन तुटवड्यामुळे झाले नसल्याचं जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.

    ही घटना समोर आल्यानंतर सह जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालयास भेट देऊन, ऑक्सिजन पुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. ज्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

    तसेच, त्यांनी सांगितले की, आमच्या पथकाने ऑक्सिजन प्लॅन्टची पाहणी केली आहे. आम्ही वॉर्डात जाऊन प्रत्येक लाईन आणि वॉल्वची तपासणी केली. तिथं कुठल्याही प्रकराची गळती नाही. ऑक्सिजन प्लॅन्टचा दाब देखील योग्य प्रमाणात आहे. पुरवठ्यामध्ये कोणतीही अडचण नाही. ऑक्सिजनचा योग्यप्रकारे वापर सुरू आहे.