कोरोनाचा वाढता कहर
कोरोनाचा वाढता कहर

मुंबई : राज्यात १४,७१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७,३३,५६८ झाली आहे.राज्यात आज रोजी एकूण १,७८,२३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २३ हंजार ४४४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ % एवढा आहे.
राज्यात ३५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३०, ठाणे १३, नवी मुंबई मनपा ११, रायगड १३, पनवेल मनपा ७, नाशिक ३१, पुणे ४७, सोलापूर १८, कोल्हापूर २७, सांगली १७, नांदेड ३१, नागपूर ३६ आणि अन्य ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३५५ मृत्यूंपैकी २३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू हे नागपूर ७, ठाणे ६, नाशिक ६, पुणे ५, रायगड ३, सोलापूर ३, अहमदनगर ३, औरंगाबाद १, जळगाव १ आणि कर्नाटक १ असे आहेत. आज ९,१३६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५,३१,५६३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३८,६२,१८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,३३,५६८ (१८.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,२४,२३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,६४१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.