राज्यात १४,८८८ नवे रुग्ण, २९५ जणांचा मृत्यू

मुंबई: राज्यात १४,८८८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची  संख्या ७,१८,७११ झाली आहे. राज्यात १,७२,८७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहे. राज्यात आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे. यामध्ये मुंबई २८, ठाणे ८, नवी मुंबई २, रायगड १, नाशिक १७, अहमदनगर १९, जळगाव १४, पुणे ३९, पिंपरी चिंचवड मनपा ७, सोलापूर २०, सातारा ३, कोल्हापूर १५, सांगली २०, औरंगाबाद १४, नागपूर ३६ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण २९५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यू  हे पुणे ६, ठाणे ४, सोलापूर ३, नागपूर ३, नाशिक ३, रत्नागिरी २, कोल्हापुर २, अहमदनगर १, पालघर १ आणि यवतमाळ १ असे आहेत.

आज ७,६३७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५,२२,४२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६९ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७,९४,०२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,१८,७११ (१८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,६८,९२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.