सुधागड तालुक्यात १५ नवे कोरोना रुग्ण

पाली : सुधागड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. आज तालुक्यात तब्बल १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे २६१ रुग्ण झाले असून आत्तापर्यंत कोरोनाचे १४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९९ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे.

प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य आणि नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केले आहे.