कोरोनाचे थैमान सुरुच – राज्यात दिवसभरात १५ हजार ५१ कोरोनाबाधितांची भर, ४८ जणांचा मृत्यू

सोमवारी दिवसभरात राज्यात १५ हजार ५१ कोरोनाबाधित(corona patients in maharashtra) रुग्ण सापडले आहेत. तसेच ४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर २.२७ टक्के झाला आहे.

    राज्यातील कोरोनाचा संसर्ग(corona patients in maharashtra) वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार  काही निर्बंध कडक करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात १५ हजार ५१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच ४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर २.२७ टक्के झाला आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ९०९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


    आज १०,६७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २१,४४,७४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.०७ टक्के एवढे झाले आहे.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

    वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अंशत: लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत.