corona

शनिवारी दिवसभरात राज्यात १५ हजार ६०२ नवीन कोरोनाबाधित(corona patients in maharashtra) आढळले आहेत. तसेच ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत कोरोनामुळे राज्यात ५२ हजार ८११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

    राज्यातील कोरोना रुग्णांची(corona patients) संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही.कोरोनाबाधित(corona patients in maharashtra) होणारे आणि कोरोनामुळे मृत्यू होणारे अशा दोन्ही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊन लावायची वेळ आणू नका, असा इशारा दिला आहे.

    शनिवारी दिवसभरात राज्यात १५ हजार ६०२ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत कोरोनामुळे राज्यात ५२ हजार ८११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


    शनिवारी दिवसभरात ७ हजार ४६७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,२५,२११ कोरोनाबाधितांना डिस्चार्च मिळाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.४९ टक्के एवढे झाले आहे.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७४,०८,५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,९७,७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७०,६९५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच ५ हजार ३१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,१८,५२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.