राज्यात कोरोनाचा उद्रेक -दिवसभरात तब्बल १५ हजार ८१७ रुग्णांची वाढ

दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन कोरोनाबाधित(corona patients in maharashtra) रुग्ण सापडले आहेत. तसेच ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३१ टक्के एवढा आहे.  राज्यात आजपर्यंत ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

    राज्यातील (corona patients in maharashtra)कोरोना रुग्णांची(corona patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अनेक शहरांमध्ये निर्बंध टाकण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३१ टक्के एवढा आहे.  राज्यात आजपर्यंत ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज एकूण १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    आज ११,३४४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,१७,७४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७९ टक्के एवढे झाले आहे.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७३,१०,५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,८२,१९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४२,६९३ व्यक्ती गृहविलगीकरणा मध्ये आहेत. तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.