Corona Virus Image

मुंबई: आज राज्यात(state) १५,७३८ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients) नोंद झाली असून आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १२ लाख २४ हजार ३८० झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,७४,६२३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आज ३२,००७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत राज्यात एकूण ९,१६,३४८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ % एवढे झाले.

दरम्यान राज्यात ३४४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ % एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २०० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८१ मृत्यू हे मागील
आठवडयातील आहेत. उर्वरित ६३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६३ मृत्यू पुणे -२०, नागपूर -१५, धुळे -१२, जळगाव -९, सोलापूर -२, सांगली -१, सातारा -१, ठाणे -१, बीड-१ आणि जालना -१ असे आहेत.
तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५९,१२,२५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,२४,३८० (२०.७१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,५८,९२४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,५१७ व्यक्त संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.