पालघर जिल्ह्यात कोरोनाचे १७५ नवे रुग्ण

वाडा: पालघर जिल्ह्यात आज १७५ नवे कोरोना(corona) रूग्ण आढळले आहेत. तसेच २ मृत्यूची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात १ सप्टेंबर रोजी १७५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात १४६ ही कोरोना मृतांची संख्या झाली आहे. तर एकूण रूग्ण संख्या ही ७९७२ आहे. उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६३९३ झाली आहे. सध्याच्या स्थितीत उपचारासाठी दाखल असलेले रूग्ण हे १४३३ आहेत. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात एकूण ४५३ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.