bjp and congress

मध्य प्रदेश(madhya pradesh) दौऱ्यात पुन्हा एकदा ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya shinde)यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच काँग्रेसचे दोन माजी आमदार प्रतापसिंह मंडलोई आणि अजय चौरे यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

भोपाळ: मध्य प्रदेश(madhya pradesh) दौऱ्यात पुन्हा एकदा ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya shinde)यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच काँग्रेसचे दोन माजी आमदार प्रतापसिंह मंडलोई आणि अजय चौरे यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेही उपस्थित होते. मंडलोई माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांचे तर अजय चौरे माजी मुख्यंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय मानले जातात. तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये चौरेंचे वडील रेवनाथ चौरे मंत्री होते.

छिंदवाडात चौरे कुटुंबीयांचा प्रभाव
छिंदवाडातील सौंसरमध्ये चौरे कुटुंबीयांचा बोलबाला आहे. यहा भाग माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा बालेकिल्लाही आहे. कमलनाथ शनिवारी छिंदवाडात दाखल होण्यापूर्वीच चौरे कुटुंबीयानी कमलनाथ यांना दे धक्का दिला. चौरे सौंसर येथून १९९८ मध्ये काँग्रेसचे आमदार होते तर २०१८च्या निवडणुकीत त्यांच्या भावाने विजय संपादन केला होता. यापूर्व विजय चौरेंचे वडीलही १९७७ ते १९८५ दरम्यान सौंसरचे आमदार होते. विजय चौरे यांची आईही काँग्रेसच्या नेत्या होत्या.

राजगडमध्येही दे धक्का
दिग्विजयसिंह यांच्या राजगढमध्येही काँग्रेसला धक्का बसला आहे. १९९८ मध्ये राजगढ येथे आमदारकी गाजविणाऱ्या प्रताप मंडलोई यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. एकेकाळी ते दिग्विजयसिंह यांचे विश्वासपात्र म्हणून गणले जात असत. सौंधिया समाजात त्यांची चांगली पकड आहे. १९९३३ मध्ये काँग्रेसने त्यांना तिकिट दिले नव्हते. त्यानंतर प्रताप मंडलोई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती आणि शिंदे समर्थक कुसुमकांत मित्तल यांना धूळ चारली होती. त्यानंतर १९९८ च्या निवडणुकीत दिग्विजयसिंह यांनी त्यांना तिकिट दिले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीतही ते मजबूत दावेदार होते परंतु काँग्रेसने त्यांना तिकिट नाकारले होते.